परंडा (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी, परंडा तालुका च्या वतीने नवीन 2024 चे भाजपा दिनदर्शिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, प्र.का. सदस्य ॲड जहीर चौधरी, वाशी न.पं. उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, परंडा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, भुम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, वाशी तालुकाध्यक्ष राजगुरू कुकडे व दिनदर्शिकेचे प्रकाशक बाबासाहेब जाधव तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top