ताज्या घडामोडी



परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील कपिलापुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) परंडा शहर अध्यक्षपदी नुकतीच श्रीहरी नाईकवाडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन बाळासाहेब पाटील यांच्या तर्फे करण्यात आला.

 यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे खंबीर नेते नंदु शिंदे, उद्योजक पप्पू पठाण ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव अमोल काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल जगताप पाटील, ॲड.रणजित पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस गणेश चव्हाण, उद्धव पाटील, हॅटसन दूधडेरीचे चेअरमन प्रदीप पाटील, वस्ताद मनोज जैन, आकाश पाटील, सुजित पाटील, कुंतल जैन, ज्ञानेश्वर कुंभार, संदीप कुंभार, तुषार टेंभे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top