धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक अमर विठ्ठलराव राजे यांचे वयाच्या 66 व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कपिलाधार वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे ते मावस बंधू व या संस्थेचे संचालक तथा श्रीपतराव भोसले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक उदयसिंह राजे व प्रवीण राजे यांचे ते बंधू होते. शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
