धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कळंब येथे गोडाऊन फोडून 16 लाख 60 हजार 125 रूपयांचा माल पळवणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेने 24 तासात जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी  महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16 लाख 60 हजार 125 रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होतो.

गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार औताडे, जानराव, फरहान पठाण, पोलीस नाईक जाधवर, पोलीस हावलदार समाधान वाघमारे, हुसेन सय्यद चालक, पोलीस अमंलदार भोसले  यांचे पथक उपविभाग कळंब हद्दीतील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथक हे कळंब येथे आले असता पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, गोडाऊन फोडून माल पळविणारे गुन्हेगार  शंकर मच्छिंद्र काळे, श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार व इतर यांनी केला असुन ते सध्या कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपी काळे व पवार दोघे रा. कल्पानगर यांना पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन अधिक विचारपूस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. 


9 लाखाचा माल जप्त

आरोपी यांचेकडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते 6 लाख 95 हजार 175 रूपये व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र. एमएच 13 बीआर 2587 असा एकुण 9 लाख 95 हजार 175 रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.


 
Top