तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन व नाताळ सुट्या एकाच कालावधीत आल्याने या काळात तणाव वातावरण वाढले तर माञ आपले नुकसान होणार आहे. या चिंतेने तुळजापूरकर धास्तावुन गेले आहेत. या आंदोलनकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.                                 

नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ शहरी भागातील खास करुन मुंबई येथील भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनार्थ येतात. नाताळ 25 डिसेंबरला सुरु होणार असून, याच दरम्यान मराठा संघष र्योध्दा मनोज जरांगे हे  मराठा समाजास ओबीसीत आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कुच करणार असल्याने ते मुंबईत पोहचल्यावर मुंबईसह महाराष्ट्रात काय घडणार या चिंतेने ञस्त झाले आहेत. या काळात शहरी भागातील भाविक तिर्थक्षेञी तुळजापूरला येणार कि नाही याची चिंता येथील व्यवसायीकांना लागली आहे. आंदोलन धग वाढली तर हे भाविक येण्याची शक्यता कमी असल्याने याचा व्यवसायावर परिणाम होवुन तुळजापूरकरांना याचा अर्थिक रुपाने फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे   या आंदोलनाची धास्ती तुळजापूरकरांना लागली आहे. शहरी भागात नाताळ सुट्या पाच दिवस असतात. या पार्श्वभूमीवर शाळासह सर्वञ सुट्या असल्याने मुंबईसह शहरी भागातील भाविक सहकुंटुंब तिर्थक्षेञी येवुन कुलदैवताचा कुलधर्म कुलाचार करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील भाविकांनी अभिषेक पुजा, रुम बुकींग केल्या असून, तुळजापूर या काळात पुर्ण बुकींग झाले आहे. माञ मराठा आरक्षण बाबतीत मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे व सरकारमध्ये बोलणी असफल झाल्याने नाताळ सुट्यात काय होईल? याची धास्ती तुळजापूरकरांना लागली आहे. या बरोबर आंदोलन धग वाढली तर याचा वाहतूक मार्गावर काय होईल याचीही चिंता लागली आहे. कारण रस्ते अडवले तर इतर शहरी भागातील भाविक आपल्या कुंटुंब सुरक्षेसाठी सहसा बाहेर पडण्याची रिस्क घेत नाहीत. होणारे आंदोलन कशा स्वरूपाचे असेल या बाबतीत ही आणखी काही माहिती जाहीरपणे पुढे न आल्याने शहरवासियांचा चिंतेत वाढ झाली आहे. कारण भाविकांचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी व सोयीसुविधा पुरवण्यासाठी मोठा खर्च पुजारी वृंद, लाँज, हाँटेल, भक्त निवास, मठे यांनी केला आहे. हे आंदोलन नव्या वर्षचा प्रथम दिनापर्यत शांततेत पार पडावे अशी मते तुळजापूरकर व्यक्त करीत आहेत.                          


जरांगे पाटलांचा आदेश मानणार -सकल मराठा समाज                            

मराठा आंदोलन प्रकरणी गुरुवार राञी तुळजापूर पोलिस ठाण्यात शहरातील  सकल मराठा समाज बरोबर पोलिसांनी चर्चा केली. यावेळी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी दिलेला आदेश आम्ही मानणार असल्याचे मराठा समाज बांधवांनी सांगितल्याचे समजते.


 
Top