तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवार दि26रोजी श्रीदत्त जयंती  पारंपारिक पध्दतीने साजरा केला गेली. श्रीदत्त जयंती निमित्ताने शहरातील पंचायत सामिती व मंदिरातील श्रीदत्त मंदीरात भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. श्रीतुळजाभवानी मंदीरातील सकाळी श्रीदत्त मुर्तीस अभिषेक घालण्यात आल्यानंतर वस्ञ नेसविण्यात आले. नंतर श्रीदत्त मुर्तीचे पुजन देविचे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंदीरचे  विश्वास परमेश्वर, प्रविण अमृतराव, चोपदार छञे गंगणेसह भाविक उपस्थितीत होते. या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंगळवारी मार्गशिष पोर्णिमा व नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.


दत्तजयंती व बालजयंती निमित्ताने बालकांना खाऊ वाटप              

श्रीदत्त जयंती व बाल शौर्य दिनानिमित्य बाल योगी श्रेयुनाथ हे शिकत असलेल्या  रामवारदयनी शाळेत दशावतार मठाचे मठाधिपती महंत मावजीनाथ महाराज यांच्या वतीने प्रसादरुपी शिरा वाटप करण्यात आला. यावेळी शिवदत्त अरण्य महाराजसह शिक्षकवृंद सह शालेय विध्यार्थीं उपस्थितीत होते.


 
Top