धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण देश श्वास रोखून ज्या क्षणाची वाट पाहत होते, उत्तर काशीतील सिल्क्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची मंगळवारी रात्री सुखरूप सुटका झाली. प्रसंगच इतका भाऊक होता की संपूर्ण देश या क्षणाची वाट अक्षरशा श्वास रोखून पाहत होता. कारण यामध्ये अवजड अवजड यंत्रांनी सुद्धा हात टेकले पण रॅट मायनर्सने अद्भुत कामगिरी करत या 41 मजुरांना सुरक्षित रित्या जिवंत बाहेर काढले. 17 दिवस अथक चाललेल्या या ऑपरेशनमध्ये येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन माजी विद्यार्थी होते. याचा अभिमान वाटत असल्याचे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी म्हटले.  

या बचाव कार्यामध्ये असलेले तेरणा अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी आणि ए पी एस हायड्रो प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संजीव सिंग बलियान आणि दिल्ली  टनेल हायवे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट मध्ये काम करणारे सुभाष गाणे सोहम  या 1995 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. इतक्या महत्त्वाच्या मोहिमे मध्ये धाराशिव अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्यामुळे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील  मल्हार  पाटील, सर्व विश्वस्त, तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वक प्रा.गणेश भातलवंडे, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी सार्थ अभिमान वाटत असल्याच्या भावना बोलून दाखविल्या. त्यांच्या कार्याचा महाविद्यालय आणि धाराधिव मध्ये सर्वत्र गौरव, कौतुक होत आहे.


 
Top