भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात पक्ष पातळीवरील मोठ्या प्रमाणात जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी विशेष निमंत्रित सदस्य व भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुखपदी बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्षपदी सुदाम पाटील, जिल्हा चिटणीसपदी अंगद मुरूमकर, कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्यपदी सचिन बारगजे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भूम तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,  तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, शहराध्यक्ष शंकर खामकर, शहर अध्यक्ष प्रदीप साठे, मीडिया विभाग तालुकाध्यक्ष सुहास बुरटे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ, वाकड ग्रामपंचायत सरपंच अमोल मासाळ, सोसायटी चेअरमन रोहिदास मासाळ,  संचालक नवनाथ शेळके, युवा तालुका उपाध्यक्ष समाधान मासाळ, रवींद्र मासाळ पप्पू दाभोळकर आदींची उपस्थिती होती.


 
Top