धाराशिव (प्रतिनिधी)-येथील प्रेरक वक्ते अर्शद सय्यद यांनी सौदी अरेबिया येथील किंग अब्दुलअज़ीज़ इंजिनियरिंग कॉलेज व किंग अब्दुलअज़ीज़ विद्यापीठात विद्यार्थ्यांना करिअर आणि व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. सौदी अरेबियात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेले धाराशिव येथील ते एकमेव मार्गदर्शक आहेत. हा बहुमान मिळाल्याबद्दल अंजुमन वेलफेअर सोसायटीच्या वतीने अर्शद सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.

सौदी अरेबियामधील जेद्दाह शहरात तृतीय वर्षात एरोनॉटिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरक वक्ते अर्शद सय्यद यांनी करिअर, व्यक्तीमत्त्व विकास, नोकरीच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. धाराशिव शहरातून विदेशात व्याख्यानासाठी निमंत्रित केलेले अर्शद सय्यद हे एकमेव तरुण व्याख्याते आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ. अक्रम आणि फैसल सय्यद यांनी परिश्रम घेतले. धाराशिव येथे आल्यानंतर अंजुमन वेलफेअर सोसायटीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. डॉ. रशीद सय्यद, अथर खान, वसीम शेख, जुबेर पठाण उपस्थित होते.


 
Top