भूम (प्रतिनिधी)-मन्मथ स्वामी तीर्थक्षेत्र विकासासाठी दीड कोटी रुपयाचा निधी देणार असल्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सांगितले. श्री शेत्र मन्मथ स्वामी देवस्थान शिवखडा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत 35 लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधकाम भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला यावेळी सावंत बोलत होते.
मन्मथ स्वामी देवस्थान येथे कुणाच्या जवळ संरक्षण भिंत बांधकाम करणे गरजेचे होते. त्यासाठी बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर यांनी सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. कार्यक्रमासाठी अमेय पाटील, कमलाकर फाळके, संदीप मगर, गलांडे साहेब, गिराम साहेब, आश्रुबा कदम,विक्रम चव्हाण, समाधान सातव, सचिन बरनाळे, डॉ. त्रिंबक स्वामी, मुक्तापा तळेकर आदीसह गावातील गावकरी उपस्थित होते.
