भूम (प्रतिनिधी)-येथील भीम नगरमध्ये प्रज्ञा करुणा बुध्दविहाच्या प्रांगणामध्ये 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड मुक्कामी मनुस्मृतीचे दहन केले व सबंध स्त्री वर्गाला जाचक रूढी बंधनातून मुक्त केले. यानिमित्ताने सर्व महिलांनी यावेळी स्त्री मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नंदाताई शिंदे व शारदा भोसले या बुद्धांच्या विविध स्थळांचे दर्शन घेऊन आल्याबद्दल त्यांचा सत्कार महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मालनताई इंगळे, शितल शिंदे, विद्या शिंदे, पूजा जानराव, मंदा शिंदे, उमा शिंदे, संगीता लगाडे, सुरेखा शिंदे, शीला शिंदे, माया गायकवाड, पंचशील गायकवाड उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन बोदाचार्य मुकुंद लगाडे यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध उपाशीका उपासकासह अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top