धाराशिव (प्रतिनिधी)-क्रिडा व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित 67 व्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा गुजरात येथील खेडा येथे संपन्न झाली. या

स्पर्धेत धाराशिव येथील परिस आण्णासाहेब पाटील यांने अचुक नेम साधत रजत पदक प्राप्त केले. सततची साधना व प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन यामुळे त्याला हे यश मिळाले. त्याच्या या अभुतपूर्व यशाबद्दल धाराशिव शहरातील कल्पतरु नगरीतील नागरिकांच्या वतीने व तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे यांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. परिसला उज्वल भविष्य आहे व तो अर्जुन पुरस्काराने सन्मानित होईल. यासाठी ही शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी परिसचे आई वडील यांचाही मुलाला प्रोत्साहन व वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास चंद्रकांत चौधरी, संपत सुतार, सुनील पवार, रासवे, सौरव मुंढे, किशोर कुलकर्णी, बाळासाहेब हजारे, आण्णासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, सतिश मेंढेकर, धनंजय लिंगे, गिरीश माळी, अमित पाटील उपस्थित होते.


 
Top