तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील मंकावती गल्लीत बसवलेले पेवर ब्लाँक उखडल्याने हा या रस्तावरुन चालने या भागातील रहिवाशांना ञासदायक ठरत आहे.
श्रीतुळजाभवानी मंदिरालगत मंकावती गल्ली असुन, यात अरुंद बोळे मोठ्या प्रमाणात आहेत. या अरुंद बोळात सर्वञ पेवरब्लाँक बसवले आहेत. माञ बसवताना ते व्यवस्थित न बसवल्याने ते उखडु लागले आहेत. पाऊस पडला कि या पेवरब्लाँक मध्ये पाणी जाते त्यावरुन चालताना किंवा दुचाकी नेताना दोन पेवरब्लाँक मधील पाण्याच्या चिंळकड्या उडत असल्याने हे पेवरब्लाँक या भागातील रहिवाशांना ञासदायक ठरत आहेत. या भागातील रहिवाशांची अवस्था भीक नको पण कुञ आवर अशी झाली आहे. तरी सदरील पेवरब्लाँक व्यवस्थित पुनश्च बसवावेत अन्यन्थात्यावर सिमेंट थर अंथरुन रस्ता करावा व हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.