धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील शम्सुल उलूम उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी नीट, सीइटी सराव परीक्षेचा वर्ग घेण्यात आला. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकुण 110 मुला-मुलीनी ही परीक्षा दिली.
महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे अध्यक्ष मोहम्मद शफी काझी, धाराशिव जिल्हा टीम व ॲन्थ्रॉटिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शम्सुल उलूम उच्च माध्यमिक शाळेत या सराव परीक्षा वर्गाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक खलील सय्यद, हामेद काझी, जुनेद काझी, नासेर काझी यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षक, पालक उपस्थित होते.