तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यात  211 मोठया तर 29 मिनी अंगणवाडया अश्या एकुन 240 अंगणवाडयातील अंगणवाडी सेवीका 204 व 208 मदतणीस

असे एकुन 412 कर्मचारी आपल्या विविध मागण्यांनसाठी संपावर गेल्यामुळे लहान मुलांचे अंगणवाडीतील किलबीलाट थांबला आहे. अंगणवाडया ओस पडल्या आहेत. अंगणवाडी महासंघाच्या वतीने विविध मागण्या साठी राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन द्यावे, मदतनिसांना 20 हजार रुपये दरमहा मानधन द्यावे, सेवानिवृत्त झाल्यानंतर निर्वाह भत्ता (पेन्शन) टी.ए. बिल, इंधनबिल, सीबीई चे पैसे, स्टेशनर स्टेशनरीचे पैसे, गणवेशाचे पैसे, सिम कार्ड रिचार्ज चे पैसे, त्वरित द्यावे यासह इतर मागण्यां करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने आंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जात असल्याने गेल्या अनेक वर्षा पासुन लढा सुरू आहे.


 
Top