उमरगा (प्रतिनिधी)- लिगांयत समाज धाराशिवव बसवरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा यांच्यावतिने लिंगायत समाजातील उल्लेखनिय काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार, सामाजिक, राज बाधवांना बसवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येते. 2024 चा पुरस्कार सोहळा 1 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता उजैन पिठाच्या जगदगुरूच्या हस्ते देण्यात येणार आहे. हे पुरस्कार वितरण बसवेश्वर मंदिर उमरगा येथे होणार आहे.
यावेळी व्यासपीठावर हभप. गहिनीनाथ महाराज, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार चंद्रशेखर पाटील हुमनाबाद, आमदार विजयकुमार देशमुख सोलापुर, आमदार सिद्धलींग पाटील, आमदार शरणु सलगर, आमदार बि.आर.पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, बापुराव पाटील यांच्या उस्थितीत होणार आहे. यासाठी संयोजन समिती सन्नी पाटील, प्रविण स्वामी, शिवकांत पतगे, सोमनाथ माळगे, महेशंकर पाटील, बालाजी पतगे, करण पाटील, जगदिश वरकले, संदिप लिंबाळे, विपुल माळी, सोमनाथ पतगे आदी परिश्रम घेत आहेत.
