भूम (प्रतिनिधी)-आपल्या शासकीय नोकरीतील पहिला पगार आपण गावच्या विकासासाठी देवू असे मत भूम तालुक्यातील वालवड येथील प्रा. भागवत दुधाळ यांनी व्यक्त केले. प्रा. दुधाळ यांची शासकीय आयटीआयच्या प्राध्यापकपदी निवड झाल्याबद्दल वालवड ग्रामपंचायतच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी उपसरपंच कृष्णा मोहिते यांनी दुधाळ यांच्या यशाची प्रेरणा घेवून गावातील तरूणांनी वाटचाल करावी. जेणेकरून भविष्यात सरकारी नोकरदारांत गावातील युवकांचा सहभाग वाढेल. दिलेला पगार गावातील सामाजिक कार्यात उपयोगात आणता येईल असेही मोहिते यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पांडुरंग देवळकर यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच श्रीहरी बारस्कर, ग्रामपंचायत सदस्य प्रविण खटाळ, संदिप पाटील,उमेश मोहिते,भारत पाटोळे, जनसेवा बँकेचे जालिंदर मोहिते,माजी उपसरपंच जयलानी शेख, माणिक माळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top