धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील गवळी समाजाच्यावतीने शतकानू शतकापासून चालत आलेले परंपरेनुसार, याही वर्षी गवळी समाजाच्यावतीने गवळी गल्लीतील मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा श्री च्या साक्षीने गवळी समाजाच्या वतीने सगर पूजेचा कार्यक्रम अत्यंत आनंदी, प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. 

दीपावली पाडव्याच्या निमित्ताने गेली अनेक वर्षापासून गवळी समाज पशुपालक यांनी ढोल ताशा, बँड पथक  वाद्य वाजवून रेडा, म्हशी यांच्या आकर्षक सजावटीने, अंगावर विविध वेलबुटी विविध आकर्षक केशरचनेतूू मोरपंखाचे मूरकूजा, पायात पितळी तोडे घालून सजवून सगर पूजेला, आपल्या परिवारासह महिलाकडून ओवाळून, हळदी कुंकू लावून नैवेद्य खाण्यास दिला जातो. रेडा व म्हशीस, कारभारी मंडळींच्या समोर सलाम करावयास लावली जातात. त्यानंतर सलाम करणाऱ्या व्यक्तीस कपाळावर टिळा लावून, पान सुपारी देऊन त्यांचा सन्मान केला जात होता. सर्व महिला व एकमेकीच्या माहेरी आलेल्या लेकी- सुना यांच्या गाठीभेटी व हळदीकुंकू लावून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला जात होता. तरुण मुलांना टिळा लावून त्यांना या परंपरेची जाण करून देण्याचा प्रयत्न समाजाने आजतागायत चालू ठेवलेला आहे. दरवर्षीप्रमाणे वाद्य ताफ्यासह व शोभेच्या दारूच्या आतषबाजीत मिरवणुकीने काळा मारुती येथे येऊन हनुमानाचे दर्शन घेऊन मिरवणूक विसर्जित केली जाते. सर्व पशुपालक येथे पशूंची सलामी देऊन आशीर्वाद घेतला जातो. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. गजानन गवळी, नंदकुमार हुच्चे, मनोज अंजीखाने, गिरीजाप्पा दहीहंडे, कुंदन दहीहंडे, राजकुमार दिवटे व बंधू आप्पा, राजू पंगुडवाले, राम-भरत- लक्ष्मण मिसाळ, विठ्ठल आपुने, भालचंद्र हुच्चे इ.परिश्रम घेऊन फटाक्याच्या आतषबाजीत संपन्न झाला.


 
Top