तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदीरात भाविक भक्त तसेच इतरांना दर्शनासाठी तिन्ही पुजारी मंडळांना व्हीआयपी पासेस देण्याची मागणी   श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशाासन यांच्याकडे  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

श्रीतुळजाभवानी  मंदिर संस्थानमध्ये विश्वस्त म्हणून श्रीतुळजाभवानी मंडळाचे प्रतिनिधीत्व होते. काही कारणास्तव विश्वस्त म्हणून नेमणुकीचा प्रश्न प्रलंबित आहे. तरी तिन्ही पुजारी मंडळांना प्रति पन्नास पन्नास पासेस दररोज देण्यात यावेत म्हणजे तिन्ही पुजारी मंडळांकडे येणारे भाविक भक्त, व्हीआयपीची सोय होईल. तरी आपण या प्रकरणी तात्काळ अमंलबजावणी करण्यासाठी आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन ॲड. धिरज पाटील, रुषीकेश मगर, अमोल कुतवळ यांनी मंदिराचे वित्त व लेखा अधिकारी सिध्देश्वर शिंदे यांना दिले आहे.


 
Top