तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्य शासनाकडून दिवाळीनिमित गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना अवघ्या  शंभर रुपयांत देण्यात येणारा आनंदाचा शिवा उशिरा का होईना अखेर रेशन दुकानांमध्ये पोहोचला. असून त्याचे वाटपही सुरू करण्यात आले आहे.

दिवाळी तोंडावर आली तरीही आनंदाच्या शिधातील दोन वस्तु न आल्याने आनंदशिधा वाटप रखडले होते.मात्र अखेर राहिलेले पोहे सह अन्य एक वस्तु गुरुवारी उपलब्ध झाल्याने गुरुवार पासुन रेशन दुकान ते शिधापञिका धारकांना अखेर आनंदाचा शिधा वितरण सुरु झाले. त्यामुळे रेशन दुकानांसमोर नागरिक शिस्तीत रांगा लागून आनंदाचा शिक्षा घेत आहेत. आनंदाचा शिधा रेशन दुकानांमध्ये पोहोचला नव्हता. त्यामुळे सामान्य नागरिकांची दिवाळी यंदा गोड होणार की कढू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अखेर आनंदाचा शिधा प्राप्त झाल्याने 43944शिधापञिका धारकांना वाटप सुरु झाले आहे.


 
Top