तुळजापूर (प्रतिनिधी)- सोयाबीन च्या भाववाढ शक्यता पार्श्वभूमीवर सध्या येथील कृषी उत्पन्नबाजार समिती मध्ये सोयाबीन आवक घटल्याचे दिसुन येत आहे.मागील पंधरा दिवसापुर्वी सोयाबीन आवक 1500 क्विंटल होती ती आता 350ते400क्विंटल वर आली आहे. मागील पंधरा दिवसापुर्वी क्विंटल ला 4300 भाव होता आत 4850 रुपयावर पोहचला आहे. 

दिवाळी नंतर सोयाबीन भावा 5300पर्यत जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहे .भाववाढ च्या चर्चने माञ शेतकऱ्यांनी सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये  विक्रीस न आणने पसंद केल्याने बाजार समितीत सिझन मध्ये शुकशुकाट जाणवत आहे. भाववाढ अफवा शेतकऱ्यांच्या पय्थावर पोहचल्याची चर्चा आहे. पंधरा दिवसात क्विंटल मागे सोयाबीन मध्ये 550 रुपये भाव वाढ झाली आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना दिवाळी नंतरच च्या सोयाबीन भावाची उत्सुकता लागली आहे.


 
Top