तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यात यंदा  पावसाने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता पावसाने  निरोप घेतला. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. सध्या मागील  तीन चार दिवासा पासुन तालुक्यातीतील कसई, मंगरुळ, काटी, सावरगावसह अनेक गावातील पंचक्रोषीत पाऊस पडत आहे. खरीप पेरणी झालेल्या रबी ज्वारीला हा पाऊस पोषक ठरणार आहे. तालुक्यातील अनेक प्रकल्पात पाणी न आल्याने पाणीसाठा वाढला नाही. यामुळे पुढील वर्षी मृग नक्षत्र आरंभ पर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे द्राक्षबागांना ढावण्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. 

यामुळे द्राक्ष बागायदारांकडून वारंवार फवारण्या सुरू आहेत. ऐन घडनिर्मिती होण्याच्या प्रक्रियेदरम्यान अवकाळी हजर झाला आहे. सध्याच्या चार दोन दिवसाच्या वातावरणामुळे बागांवर परिणाम होणार नाही. मात्र पाऊस पडला आणि असेच वातावरण राहिले तर मात्र द्राक्ष बागांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन कडुन केली जात आहे.दरम्यान, आता अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असुन  काही भागात पावसाने 2 दिवसांपासून सुरुवातही केली आहे. . हा पाऊस मोठा झाला तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आदी पिकांना फायदा होईल. मात्र फेब्रुवारीनंतर बागायतदारांना टँकरने पाणी आणावे लागणार आहे. तालुक्यातील  काही भागात अवकाळीच्या हलक्या सरी झाल्या. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु द्राक्षबागायतदार अन्‌‍ ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाहीत, त्यांचे नुकसान होणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रब्बीतील पिकांच्या व द्राक्षबागांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा नाही. फेब्रुवारीपर्यंत पुरेल असा अंदाज असून, मार्च, एप्रिल महिन्यात द्राक्ष बागांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यताही आहे.

 

काही भागात  अजुन सोयाबीन चे खरीप खळे सुरु आहेत.मागे राहिलेले धान्य दिवाळीपूर्वीघरी आणण्याची लगबग सुरु आहे.



 
Top