धारशिव (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र धनुर्विधा संघटनेच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मुंबई धनुर्विधा संघटनेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या घेण्यात आल्या. 14 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय शालेय धनुर्विधा क्रीडा स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करत धाराशिव जिल्हा धनुर्विधा संघटनेच्या श्रेया वाघोलिकर, श्रुतिका क्षीरसागर, आरुषी क्षीरसागर आणि परिस पाटील यांनी कास्य पदक पटकाविले आहे. गुजरात येथे होत असलेल्या राष्ट्रीय धनुर्विधा स्पर्धेसाठी परिस पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

धाराशिव जिल्हा धनुर्विधा संघटनेच्या जिल्हा धनुर्विध्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेले धनुर्धरानी कंपाऊंड राऊंड प्रकारात मुलींची वयोगटातून श्रेया वाघोलिकर, श्रुतिका क्षीरसागर, आरुषी क्षीरसागर सांघिक कास्य तर मुलांच्या वयोगटात परिस पाटीलने वैयक्तिक कास्य पदक पटकाविले आहे. लातूर विभाग कंपाऊंड संघाचे संघ मार्गदर्शक म्हणून कैलास लांडगे यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून वर्षा हाजगुडे यांनी काम पहिले आहे. दरम्यान विजयी खेळाडूंचे धाराशिव जिल्हा धनुर्विधा संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा धनुर्विधा संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश गडदे, उपाध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलिकर, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, सदस्य डॉ श्रीकांत कवठेकर, सुधीर बंडगर, अनिल जमादार, गोविंद मराठे, तांत्रिक समिती प्रमुख नितीन जामगे, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड, सौरभ सरफाळे, अण्णासाहेब पाटील आदींसह खेळाडू, पालक, पदाधिकारी आणि क्रीडा प्रेमिनी अभिनंदन केले आहे.


 
Top