धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जि. धाराशिव यांची जिल्हा मेळावा आयोजित केलेली असून  सदरील मेळावा दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी  दूपारी 12.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तरी सदरील मेळाव्यास खासदार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, राज्याध्यक्ष विलास कुमारवार, राज्य उपाध्यक्ष (महिला आघाडी) अश्विनीताई मेश्राम, राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे, सहसचिव अनिल भोंगे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष नवनाथ नरवडे  हे उपस्थित राहणार आहेत.

तरी सदरील मेळावा समर्थ मंगल कार्यालय, ओमराजे कॉम्पलेक्सच्या पाठीमागे, येडशी रोड, धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सदरील धाराशिव जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जिल्हाध्यक्ष उध्दव घाडगे, जिल्हा सचिव अरूण रसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top