तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर  नगरपरिषदने  शहराला  दोन दिवसाआड पाणीपुरवठा  करण्याच्या निर्णय भाविकांचे हाल होणारे असल्याने या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.                                

नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की,तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी परराज्यातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी सतत येत असतात. पाणीपुरवठा दोन दिवस आड केल्यास भाविक भक्तांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. तर या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. त्याचबरोबर आपण दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारा असाल तर या काळातील पाणीपट्टी ही कमी करावी लागेल.

तुळजापूर शहरांमध्ये जेवढे बोरवेल असतील ते नगरपालिकेच्या वतीने दुरुस्त करण्यात येऊन पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात यावी. तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी किती आहेत.याची यादी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ऋषिकेश  मगर, अमोल कुतवळ, शाम पवार, नगरसेवक रणजीत इंगळे, संदीप गंगणे, नगरसेवक सुनील  रोचकरी, अमर चोपदार, नगरसेवक राहुल खपले, तोफिक शेख,आनंद जगताप, अभिजीत कदम, करण साळुंखे, सुदर्शन वाघमारे, मकसूद शेख, शरद जगदाळे, औदुंबर करंडे यासह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.


 
Top