तुळजापूर (प्रतिनिधी)- त्रिपुरारी  पौर्णिमा निमित्ताने रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी श्री तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज  मंदीर आकर्षक फुलांनी सजवले होते. ञिपुरारी पोर्णिमा व रविवार सुट्टी पार्श्वभूमीवर  पहाटे एक वाजल्या पासुन भाविकांनी देवीदर्शनार्थ गर्दी केली होती.

आज मंदिर भाविकांनी तुडुंब भरले होते व दर्शन मंडप ही फुल्ल झाला होता. दिवसभर भाविकांनी पोर्णिमेचे देविस धार्मिक विधी केले. राञी सांयकाळी श्रीतुळजाभवानी मातेस भाविकांचे दही, दुध, पंचामृत अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देविस वस्ञोलंकार घालण्यात आले. त्यानंतर नित्योपचार पुजा करण्यात येवुन छबिना काढण्यात आला. नंतर महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर ञिपुरारी पोर्णिमा निमीत्ताने जोगवा मागितल्या नंतर पोर्णिमा दिनाचा धार्मिक विधीची सांगता झाली.


मंदिर विविध फुलांनी सजवले

त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमा निमित्त तुळजाभवानीचे भक्त मयूर वसंतलाल शेटिया. अर्पणा मयूर शेटीया, ऋषभ मयूर शेटिया, विनोद प्रकाशलाल कटारिया, वैशाली विनोद कटारिया, दत्ता मोरे, जयदीप ठाकर अहमदनगर यांनी तुळजाभवानीचा गाभारा व पूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवले. आई तुळजाभवानी यांच्याकडून अशीच सेवा घडू दे हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली. 


 
Top