तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांनी गुरुवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारशी झालेल्या वाटाघाटीनंतर आपले आंदोलन 2 जानेवारीपर्यंत मागे घेतले आहे. त्यामुळे एसटी महामंडख प्रशासनाने एसटी बससेवा शुक्रवारी दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच पूर्ववत सुरू केल्याने भाविक प्रवाशी शालेय विध्यार्थीं यांना मोठा दिलासा मिळाला आहे.                

एसटीबस बस सेवा बंद असताना सर्वाधिक शालेय विध्यार्थांना मोठा फटका बसला होता. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोर्णिमा संपन्न होताच बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, आता मराठा आंदोलन मागे घेतल्याने शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

पोर्णिमा नंतर आंदोलन ज्वर वाढताच बस आगारातून बससेवा बंद करण्यात आली होती. विशेषता संभाजीनगर, जालना, बीड नांदेड, सोलापूर येथुन बसेस येणे बंद झाले होते. त्यामुळे भाविकांनी खाजगी वाहनांच्या माध्यमातून श्री तुळजाभवानी दर्शनासाठी मोठ्या संखेने भाविक तुळजापूरला येवुन गेले. मात्र, आता मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्याने एसटी महामंडळाने बससेवा सुरू केल्याने ओसाड पडलेले बस स्थानकाचा परिसर पुन्हा भाविक, प्रवाशांनी गजबजुन गेला आहे.

आपली बससेवा पूर्ववत सुरू केली आहे. ऐन दिवाळी व शाळांच्या सहामाही परीक्षांच्या तोंडावर एसटी सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.     


एसटी बससेवा बंद काळात दुप्पट भाडे करून भाविक व प्रवाशाकडुन दुप्पट भाडे आकारुन मोठी अर्थिक लूट केली. यात  धाराशिवला जाण्यासाठी  वीस रुपये भाडे असताना चाळीस रुपये. सोलापूरला जाण्यासाठी पंचाहत्तर दर असताना दीडशे रुपये. उमरग्याला जाण्यासाठी सवाशे भाडे असताना अडीशे रुपये तर लातुर जाण्यासाठी दीडशे रुपये भाडे असताना तीनशे रुपये आकारले. यात विध्यार्थांना ही सोडले नाही. मराठा आंदोलन काळात माञ कर्नाटकातील बससेवा सुरुळीत चालु होती. माञ पोर्णिमा संपताच त्यांच्या सेवेवर परिणाम झाला.


 
Top