भूम (प्रतिनिधी)-माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याचे निवेदन भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी  येथे वेळ सकाळी 10 वाजता देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील दूध उत्पादक व शेतकरी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे यांनी केले आहे.

या निवेदनामध्ये शासकीय नियमानुसार दुधाचा भाव 34 रुपये प्रतिलिटर असूनही शेतकरी दूध उत्पादकांना 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळत असून दुधाचे दर वाढवणे, जीआर मध्ये पशुखाद्य दरवाढी संदर्भात दरवाढ कमी करण्याची मागणी असूनही या महिन्यात पशूखाद्याचे दर 25 ते 30 रुपयांनी वाढलेले असणे, दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीमधून संपूर्ण भूम व परांडा तालुका वगळलेला असून दोन्ही तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये करणे,परांडा मतदार संघातील जवळा, आसू, पाचपिंपळा, अंभी, वालवड, माणकेश्वर, भूम, पाथरूड, आष्टा,वाशी व तेरखेडा अशी एकूण 11 महसूल मंडळे 25% अग्रीम पीक विम्यामधून वगळली आहेत. तरी त्यांचा पुन्हा समावेश करून या मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आत जमा करणे या मागण्यांसाठी निवेदन देण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भूम तालुका सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच शेतकरी व दूध उत्पादक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top