धाराशिव (प्रतिनिधी)-लातूर विभाग स्तर शालेय मॉडर्न पॅन्टॅथलॉन क्रीडा स्पर्धा दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी रॉयल स्विमिंग पूल तुळजापूर येथे पार पडल्या. ही स्पर्धा 1500 मी रनिंग लगेच 200 मी स्विमिंग व नंतर लगेच 1500 मी रनिंग अशी असुन या स्पर्धेमध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ (यमगरवाडी) ता. तुळजापूर येथील खेळाडूंनी अतिशय मोलाची कामगिरी करून यश संपादन केले. त्यांना सोमनाथ माळी तहसीलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व क्रीडा अधिकारी नाईकवाडी यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये ओमकार भोसले - प्रथम क्रमांक, प्रवीण जाधव - द्वितीय क्रमांक, कर्ण धनके - तृतीय क्रमांक, माऊली पवार - चौथा क्रमांक
असे क्रमांक मिळवून यश संपादन केले. चार खेळाडूंची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.