तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मोबाईल मेडिकल गाडी माध्यमातून ग्रामस्थांच्या विविध तपासणी उपक्रम उदघाटन काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.  या फिरती मोबाईल दवाखानाचा लाभ घेवुन आपली आरोग्य चांगले ठेवावे व याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असा आवाहन गावचे सरपंच कालिदास खताळ यांनी केले.

सदरील मोबाईल व्हँनमध्ये विविध तपासण्या ऐक्सरेसह अनेक आजारावर उपचार केले. जातात यात दोन डाँक्टर व पाच आरोग्य कर्मचारीआहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल नागरगोजे, आरोग्य सहाय्यक सतीश कोळगे,आरोग्य सेवक अडसूळ यांनी केले आहे. उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुजित घोगरे, सद्दाम मुलानी, माजी चेअरमन हरिभाऊ वटे, दुर्वा सुरवसे, शिवाजी  सुरवसे, किसन देडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top