धाराशिव (प्रतिनिधी)- कुष्ठरोगाचा प्रसार शुन्यावर आणणे हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्यात कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC) व सक्रीय क्षयरुग्ण शोध (ACF ) 20 नोव्हेंबर ते 6 डिसेबर 2023 या कालावधीत 100 टक्के ग्रामीण भाग व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये राबविण्यात येत आहे. त्याबाबतची जिल्हा समन्वय समितीची बैठक 6 नोव्हेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली पार पडली.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरीदास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आय के. मुल्ला, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग)  डॉ. एम. आर. कोरे  व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफीक अन्सारी व इतर जिल्हास्तरीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

संशयीत कुष्ठरुग्णांची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. निदान निश्चीत झाल्यास त्यांना बहुविध औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. एम. आर. कोरे यांनी दिली.  

खोकला, ताप,वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, छातीत दुखणे, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशा प्रकारची शरीरावर लक्षणे दिसल्यास त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क  साधावा व तपासणीकरीता घरोघरी येणाऱ्या आशा व पुरूष स्वयंसेवकास सहकार्य करावे व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.


 
Top