भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी, चारा टंचाई पुढील काळात उपलब्ध विहिर, बोर अधिग्रहण करणे, चारा टंचाई संदर्भात चर्चा व पाहणी दौरा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी भूम तालुक्यातील वालवड या गावांमध्ये जाऊन पाणी संदर्भात पाहणी केली. यावेळी वालवड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी विविध तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडल्या. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करा असे यावेळी सांगितले. वालवड गावातील समस्या यावेळी गावकऱ्यांनी मांडल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सचिन खाडे, संजय स्वामी, विजय वाघमारे, प्रवीण खटाळ, बालाजी गुंजाळ, जालिंदर मोहिते, महावितरण, पंचायत समिती, कृषी कार्यालय आदी विभागाचे अधिकारी व वालवड गावातील नागरिक, शेतकरी यावेळी उपस्थित होते.