धाराशिव (प्रतिनिधी)-तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चांद्रयानगुट्टा विधानसभा मतदार संघासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने खलील सय्यद यांची निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खलील सय्यद यांना निवडीचे पत्र दिले आहे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,युवा नेते राहुल गांधी,तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील,ज्येष्ठ नेते  मधुकरराव चव्हाण अल्पसंख्याक विभाग माजी प्रदेशाध्यक्ष एम. एम.शेख माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, तेलंगणा समन्वयक जितेंद्र देहाडे यांनी खालील सय्यद यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.


 
Top