लोहारा (प्रतिनिधी)-लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील बालाजी विद्यालयात पोलीस प्रशासन व तावशी गड गावचे सामाजिक कार्यकर्ते धीरज बाबुराव घोटाळे यांच्या संकल्पनेतून दिवाळी उत्सव निमित्ताने गावातील अपंग, निराधार, ज्या कुटुंबांना शासकीय धान्य भेटत नाही अशा कुटुंबांना दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख म्हणून उमरगा, लोहारा पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते लोहारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश नरवटे, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये एकूण 41 निराधार कुटुंबांना दिवाळी फराळ किट देण्यात आले. या कार्यक्रमास निरंजन कुलकर्णी, रमेश चंडकाळे, बापू मडोळे, संदीप पाटील, सुरज तोतला, तंटामुक्त अध्यक्ष राम अण्णा मिटकरी, प्रमोद पवार, पंचशीला मनोहर, माजी सरपंच छाया मनोहर, ज्ञानेश्वर मिटकरी, किशोर बिराजदार, संजय मिटकरी, पप्पू पवार, बाबा मिटकरी, मुन्ना राजपूत, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.