धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीत प्रति वर्षाप्रमाणे धाराशिव जिल्हा संस्कार भारती च्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला. श्रीपतराव भोसलेचे कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी प्रथम संस्कार भारती भुअंलकरण करण्यात केले. संस्कार भारती ध्येयगीत तसेच छत्रपती शिवाजी महाराज ध्येयमंत्र सर्वांनी म्हटले त्यानंतर दिवे लावून दिपावलीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
या दिपोत्सव प्रसंगी जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर, जिल्हा नाट्यविधा प्रमुख धनंजय कुलकर्णी, विवेकानंद केंद्र प्रमुख श्यामराव दहिटणकर, मुख्याध्यापक सतिश जाधव, जिल्हामार्गदर्शक संस्कार भारती शेषनाथ वाघ, सुनीता दहिटणकर, प्रगती संभाजी बागल, उपस्थित होते. सार्थकी वाघ, अर्णव दहिटणकर, मैथिली, श्रीया, हर्षदा, विशाखा संभाजी बागल, सत्यहरी वाघ यांनी दिपउत्सवासाठी परिश्रम घेतले.