तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अणदूर येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथील दोन युवकांनी गुरुवार दि2 पहाटेपासून पाज वाजल्या पासुन महामार्ग लगत असलेल्या मोबाईल  बीएसएनएल टॉवर वर चढून आंदोलन सुरू केले.

विशेष म्हणजे या आंदोलनात एक इतर जातीचा व एक युवक नावे असल्याचे समजते. आंदोलन स्थळी अणदुरसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनास्थळी नळदुर्ग पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झाला. आंदोलक खाली उतरण्यास तयार नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.


 
Top