धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या न्याय मागणीस समतावादी मुस्लीम युवा संघटनेच्यावतीने उपोषणस्थळी येऊन दि.2 नोव्हेंबर रोजी जाहीर पाठींब्याचे पत्र दिले आहे.
दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक दशकापासून मराठा व मुस्लीम हे शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याची मागणी शासनाकडे करीत आहेत. परंतू अद्यापपर्यंत शासनाने मराठा आरक्षण देण्यासाठी योग्य ते कायदेशीर पावले उचललेली नाहीत. त्यामुळे समाजामध्ये शासनाबद्दल तीव्र असंतोष आहे. शासनाने मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत न पाहता त्यांची न्याय मागणी मान्य करावी. तसेच धाराशिव येथील मराठा समाजातील ज्या लोकांनी आरक्षणा विषयी कठोर भूमिका घेवून न्याय मागणीसाठी उपोषणाच्या मार्गाने आवाज उठविला आहे. त्यांना मुस्लीम समाज व समतावादी मुस्लीम युवाच्यावतीने जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी अनवर मुजावर, शहानवाज सय्यद, जमीर शेख, अस्लम मुजावर, सादेख मुजावर, मुस्तखिम शेख, निहाल शेख, आरेफ मुलाणी, सद्दाम मुजावर, लतीफ सय्यद, अजु शेख, शाकेर शेख, काफिल सय्यद, अशपाक शेख, अजमेर शेख, मोहसीन शेख आदींसह इतर बांधव उपस्थित होते.