धाराशिव (प्रतिनिधी)-65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे (गादी गट) यांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. राक्षे यांनी हर्षवर्धन सदगीर (माती गट) या दोघात अंतिम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्यावेळी 1.42 मिनिटाचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्याने जखमी झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पुन्हा मैदानात उतरला. 

शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणार मानकरी ठरला. त्यांनी मानाची चांदीची गदा, व स्कॉर्पिओ जिंकली. राक्षे पुण्यातील असून, नांदेड करून प्रतिनिधीत्व करतात. मॅटवरील कुस्तीत 6-0 गुणांनी शिवराज राक्षे यांनी प्रतिस्पर्धी पैलवानावर मात करीत विजय मिळविला. धाराशिव येथील स्टेडियमच्या गुरूवर्य के. टी. पाटील क्रिडानगरी येथे रूस्तुम ए-हिंद हश्चिंद्र बिराजदार आखाड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी आमदार कैलास पाटील, ऑलिपिक कास्यपदक विजेते योगेश्वर दत्त, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकुर्णी या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

माती गटातून गणेश जगताप 2 गुण व हर्षवर्धन सदगीर 6 गुण अशी लढत होवून हर्षवर्धन विजयी झाले. तर गादी गटात शिवराज राक्षे 10 गुण व पृथ्वीराज मोहोळ 0 गुण अशी एकतर्फी कुस्ती झाल्यामुळे राक्षे विजयी झाले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालिम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेचे सुधीर पाटील, अभिराम पाटील, आदित्य पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. ऑलिपिक कास्यपदक विजेते योगेश्वर दत्त, महाराष्ट्र केसरी राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, माजी खासदार रविंद्र गायकवाड, जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनजंय सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे, संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, धनंजय शिंगाडे, विकास कुलकर्णी, जयसिंह देशमुख, सुधाकर मुंडे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष विजय बराते, विभागीय सचिव वामनराव गाते, भारत मेकाले, सुंदर जवळगे, संतोष नलावडे, गोविंद पवार, शिवाजी धुमाळ आणि याप्रसंगी हजारो कुस्ती क्रिडा प्रेक्षक उपस्थित होते. 
Top