धाराशिव (प्रतिनिधी)-महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपरी (शि.) येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राऊत यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे रविवारी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाळासाहेब राऊत यांनी सामाजिक कार्यात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे. सावंतवाडी येथे रविवार, 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.शिवाजी पाटील यांच्यासह आयोजक पदाधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब राऊत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.