परंडा (प्रतिनिधी) - माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे भारतीय जनता पार्टी परंडा तालुकाध्यक्ष पदी ॲड. गणेश खरसडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या. ॲड.गणेश खरसडे यांची निवड भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. 

या सत्करावेळी ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. तानाजी वाघमारे, बाबासाहेब जाधव, उमाकांत गोरे, बबन जाधव, नागेश शिंदे, अविनाश विधाते, मनोज पवार, रामदास गुडे, गौरव पाटील, सुरज काळे, ओंकार ऐतवाडे तसेच आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top