धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपामध्ये पद घेणे इतके सोपे नाह़ी पक्षाचे प्रचंड कार्यक्रम, उपक्रम अखंड सुरू असतात़ त्यामुळे पद घेतलेल्यांची जबाबदारी प्रचंड वाढली आह़े. पक्षात प्रचंड काम करावे लागेल असे आवाहन भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केल़े.

बैठकीस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने प्रारंभ करण्यात आल़ा बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आल़ा.धाराशिव येथे शुक्रवारी (द़ि. 24 नोव्हेंबर भाजपाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाल़ी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष चालुक्य यांची उपस्थिती होत़ी. 

यावेळी मंचावर प्रदेश सदस्य नेताजी पाटील, विनोद गपाट, नितीन काळे, ॲड़ खंडेराव चौरे, सतीश देशमुख, अस्मिता कांबळे, गुलचंद व्यवहारे, रामदास कोळगे, बाळासाहेब क्षीरसागर, इंद्रजीत देवकते, प्रदीप शिंदे, राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे, उपाध्यक्षा ड़ॉ सरोजनी राऊत, चिटणीस वनीता कटाळे, राणी राठोड आदींची उपस्थिती होत़ी बैठकीचे सूत्रसंचालन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी यांनी केल़े.


 
Top