तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी देवीचे वाहीक सोने मधील काचेचे खडे मोती काढुन स्वच्छ सोने तयार करणे, प्रसाद तयार प्रक्रिया पाहण्यासाठी श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तिर्थक्षेञ शिर्डी, मुंबईचे श्री सिध्दीविनायक देवस्थान व तिर्थक्षेञ पंढरपूर पाहणी अभ्यास दौऱ्यावर समिती रवाना झाली असुन या समितीने शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानला भेट दिली. यात नऊ सदस्य असुन यात देविचे महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी, धार्मिक सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ उपाध्यक्ष विपीन शिंदे सह मंदिर संस्थान प्रतिनिधी हा अभ्यास दौरा करीत आहे.
तेथील वाहीक सोने स्वच्छ करणे, पंचखाद्य किंवा लाडू प्रसाद तयार करणे प्रक्रिया काय आहे याची माहिती घेवुन पाहणी केली. ही समिती शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील सिध्दीविनायक देवस्थानला भेट देवुन रविवार पुणे नंतर तेथुन तिर्थक्षेञ पंढरपूर श्री विठ्ठल रुकमीनी मंदिर संस्थान भेट देवुन पाहणी करणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे वाहीक सोन्यातील काचेचे खडे माणिक मोती काढुन त्याचे कसे डिक्टेशन करायाचे याची ही समिती पाहणी करीत आहे. स्वच्छ शुध्द सोने आरबीआय ला द्यावे लागते मगच ते वितळता येते. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2022 पर्यंत 206किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. ते आता वितळवले जाणार आहे. या समितीतील सदस्य सोने वितळवने व प्रसाद वाटप प्रक्रिया नियमावली तयार करण्यासाठी शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी शिर्डी देवस्थान भेटीला अभ्यास दौऱ्यावर जावुन पाहणी केली आहे. येत्या महिन्यात नियमावली तयार होईल. तब्बल 14 वर्षानंतर देवीच्या तिजोरील सोने मोजण्यात आले होते. त्यानंतर ते आता वितळवले जाणार आहे.
सोने चांदी दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदिर संस्थानने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी समिती नेमली असुन या समितीत 9 सदस्य असून, त्यात महंत, पुजारी मंडळाचे सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचासमावेश आहे.