धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र, धाराशिव या ठिकाणी देखील प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे समन्वयक प्रा.डॉ. डी. एम. शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. रमेश दापके हे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top