धाराशिव (प्रतिनिधी)-देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस , देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीला सार्थ ठरवत समाजापरी परी आपण देणे लागतो याची जाणीव सर्व समाजाला व्हावी या हेतूने शंकर प्रतिष्ठान, धाराशिव यांनी आज वेद - विहार, शंकर नगर, ज्ञानेश्वर मंदिर परिसर येथे “माणुसकीची भिंत“ हा उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन येथील नगरसेवक सोमनाथ गुरव यांचे हस्ते करण्यात आले. 

या उपक्रमाला परिसरातिल नागरिक आपल्या जवळील टाकावू पण उपयोगी वस्तू जसे की कपडे, स्वेटर, मोजे, चादरी, चप्पल, बूट, पेन, वही,पुस्तके येथील भीतीवर आणून लटकवतील व निश्चित सहकार्य करतील आणि गरजू लोक आपल्या गरजे एव्हढेच घेवून जातील अशी अपेक्षा यावेळी सोमनाथ गुरव यांनी केली. यावेळी शंकर प्रतिष्ठानचे ॲड.राजेंद्र धाराशिवकर, सौ. अलका धाराशिवकर, ऋषिकेश धाराशिवकर, सौ.स्वरा धाराशिवकर, बापू निपानिकर, कृष्णा कांबळे, आणि परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.



 
Top