धाराशिव (प्रतिनिधी)- धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था म. धाराशिव या संस्थेची सन 2023 -2024 ते 2027-2028 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनाजी पांडुरंग काळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता धाराशिव यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली सहाय्यक निबंध सहकारी संस्था धनाजी पांडुरंग काळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार संचालक श्याम सुंदर बांगड यांच्या हस्ते झाला. वरिष्ठ अधिकारी सोनवळकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार संचालक डॉ सूर्यकांत खापरे यांच्या हस्ते करण्यात आला.
बिनविरोध निवड झालेल्या होऊन या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. प्रसाद जोशी यांनी योगेश संभाजीराव जाधव यांचे नाव सुचवले व अनुमोदन संचालक नितीन नायर यांनी केले. तर उपाध्यक्ष पदासाठी सौ. पद्मिनी ज्ञानोबा वाघमारे यांनी श्रीपाद रामकृष्ण पाटील यांचे नाव सुचवले व अनुमोदन डॉ. सूर्यकांत बाबुराव खापरे यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालकाचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी काळे यांनी केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संचालक श्यामसुंदर बांगड,सूर्यकांत बाबुराव खापरे, ॲड प्रसाद मधुकर जोशी, नितीन गोपाळ नायर,अभिमन्यू अरुण जाधव, नंदकुमार प्रभाकर देवळकर, सौ राधा मच्छिंद्र रणखांब, सौ शितल महादेव तोडकरी, सौ पद्मिनी ज्ञानोबा वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक आर. बी. तेरकर यांनी केले.