तुळजापूर (प्रतिनिधी)-दिंडेगाव/टेलरनगरच्या सरपंचपदी सौ.रियास अफसर सय्यद यांची निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फेटा हार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

गावातील मूलभूत सुविधांसह आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, घरकुल योजना सह गावाच्या विकासासाठी विविध स्तरातून निधी खेचून आणून गावचा विकास करण्यासाठी कट्टीबद्ध असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच नवनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ निकाळजे, मुक्ताबाई वाघमारे, गजानन चाफे, सिद्दीक पटेल, युसुफ पटेल, सुधाकर क्षीरसागर, बळी वाघमारे, महेबूब पटेल, दाऊद पटेल, जिलानी पटेल, जुबेर पटेल, वजीर मुल्ला, वसीम पटेल, पोलीस पाटील, चांद पटेल, तोफीक पटेल, विजय वाघमारे सह दिंडेगाव /टेलरनगर, ईटकळ, अरबळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top