धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठवाड्याचे सुपुत्र धाराशिव जिल्हातील संत गोरोबा काकांच्या पावन नगरीत जन्मलेले पंडीत सी.आर. व्यास यांच्या जन्म शताब्दी संगीत समारोहाचे आयोजन 7 ते 9 नोव्हेंबर केले होते. संगीत समारोहात व्यास बुवांच्या शिष्यांनी संगीत सेवा केली या सर्व गोष्टी बाबत धाराशिव जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने पंडित सी.आर. व्यास यांचे 3 सुपुत्र गायक सुहास व्यास, सुप्रसिद्ध संतूर वादक पं. सतीश व्यास, नातू आदित्य व्यास यांच्या शेला ,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या सत्कार प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा प्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ , जिल्हा कार्याध्यक्ष अनील ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, सचिव प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेशभाई वाघमारेसुंभेकर, जिल्हा नाट्यविधाप्रमुख धनंजय कुलकर्णी, शरद वडगावकर, पद्माकर मोकाशे,सौ. वर्षा कुदळे, आकाश पाटील, अक्षय भन्साळी, राजेंद्र भंडारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. नीता वाळवेकर यांनी केले.