तुळजापूर (प्रतिनिधी) - सातत्याने होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या काक्रंबा येथील शेतकऱ्यांनी थेट लातुर रोडवर असणारे सबस्टेशन गाठुन झोपलेले अधिकारी, कर्मचारी यांना धारेवर धरुन वीज पुरवठा सुरुळीत करुन घेतल्याची घटना रविवार दि. 4 रोजी पहाटे दोन वाजता घडली.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारातील तुळजापूर काक्रंबा शिवेवर असणाऱ्या पेंदे यांच्या शेतातील डीपी मधुन सातत्याने वीजेच्या लपंडावामुळे दहा दिवसांपासून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणी करणे अशक्य बनु लागल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी राञि दोन वाजता लातुर रोडवरील महावितरणचे सबस्टेशन गाठुन तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरून सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली. असता राञी तुळजापूर काक्रंबा शिव पेंदे डीपी जंप सोडुन दिल्यानंतर शेतकरी शेतात परतले.
येथील शेतकरी रब्बीच्या पेरणीला लागला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीत ओल नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर जमिनी भिजून शेतकरी पेरणी करत आहे. मात्र, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. रात्र रात्र जागून एकही सरी भिजत नसल्याने खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी
हवालदिल झाला आहे. सध्या या भागात वीजेची मागणी वाढली आहे कालबाह्य झालेल्या विद्युत वाहिन्यांन मुळे सातत्याने बिघाड होवुन वीजपुरवठा खंडीत होत आहे. यावेळी राम घोगरे, बळवंत घोगरे, सुदर्शन घोगरे, दयानंद वाघमारे, बाबा खांडेकर, शिवा वाघमारे, सचिन म्हैत्रे, विपुल कंदले, हेमंत वाघमारे, विकास घोगरे, दत्ता बचाटे, सोमनाथ घोगरे, सुधाकर मंडलिक, सोमनाथ मंडलिक, सिद्धू म्हेत्रे आदी शेतकरी उपस्थित होते.