तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव लाख येथील  बेकायदेशीर हस्तक्षेपास समर्थन करणाऱ्या महिला सरपंचास अपाञ करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवराज मेटे यांनी निवडणुक अधिकारी तुळजापूर यांच्या कडे केली आहे. 

वडगाव ग्रामपंचायत कारभारात सरंपचपतीचा हस्तक्षेप वाढला आहे. मोजे वडगांव लाख येथील सरपंच या महिला असुन   त्यांचा पतीचा विनाकारण ग्रामपंचायतमध्ये इतर सर्व कामांमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप करीत आहेत. ते काही कामे पुर्ण होवुन दहा महिन्याचा कालावधी गेला आहे. तरी कामाच्या बिलाची मागणी केली असता ते काढले जात नाहीत. तरी या प्रकरणी आपण चौकशी करुन दोषी अंती मौजे वडगांव (लाख) येथील विनाकारण बेकायदेशीर रित्या हस्तपेक्षपास समर्थन करणाऱ्या महिला सरंपच यांना तात्काळ अपात्र करुन पदावरुन कमी करण्यात येवुन आम्हाला न्याय दयावा अशी मागणी केली आहे. तरी सदरील लवकरात लवकर या विषयी योग्य ती कार्यवाही न झाल्यास मी मौजे वडगांव येथील ग्रामपंचायत समोर अमरण उषोषास बसणार आहे याची नोंद घ्यावी असा इशारा ग्राम पंचायत सदस्य मेटे शिवराज राजेंद्र यांनी निवेदनात दिला आहे. याचा  प्रत. मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तुळजापुर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, वडगांव (लाख), ता.तुळजापुर यांना दिल्या आहेत.


 
Top