धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील विविध पालावरील शाळेमध्ये रामकृष्ण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे फराळाचे वाटप व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रथमतः भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना मंडळाचे अध्यक्ष प्रा.शामराव दहिटणकर म्हणाले आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणांमध्ये आपल्या समाज बांधवांची जाणीव ठेवून त्यांच्याही चेहऱ्यावरील आनंद त्यांना आपल्या परीने मदत करून फुलवणे हे आपले सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. या भावनेतून प्रतिवर्षी असा उपक्रम साजरा केला जातो. शहरातील वासुदेव वस्ती, बोंबल्या मारुती परिसर, कुडमुडे जोशी वस्ती, सांजा चौक. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाथपंथी डवरी वस्ती, कुष्ठधाम जवळ इत्यादी सात ठिकाणी मंडळामार्फत व पुणे येथील निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या मार्फत फराळाचे साहित्य 160 विद्यार्थ्यांना, शंभर महिलांना साडी, पीस, साबण व वासाचे तेल इत्यादी देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठ्या चटया ही देण्यात आल्या. मंडळाचे अध्यक्ष प्रा शामराव दहिटणकर, सचिव अनंतराव व्यास, सदस्य नरसिंह जोशी, संतोष बडवे, प्रशांत महाजन,जीवन आडगावकर ,भगवान भोज, प्रताप मायभटे, लक्ष्मण सुपणार, हरीश जोशी, पालावरील विद्यार्थी, शिक्षक व पुरुष आणि महिला हजर होते.


 
Top